मुंबई
वेगाने वाढणाऱया म्युच्यूअल फंड हाऊसेसमध्ये गणल्या जाणाऱया मिरे ऍसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने गुंतवणूकदारांसाठी मिरे ऍसेट अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन फंड हा नवीन मुदतमुक्त श्रेणीतील (ओपन एंडेड) फंड बाजारात आणला आहे. अवघ्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी (मॅकॉले डय़ुरेशन) गुंतवणूक करु इच्छिणाऱया गुंतवणूकदारांना डोळय़ासमोर ठेवत हा फंड आणण्यात आला आहे. नवीन फंड गुंतवणुकीसाठी 28 सप्टेंबर 2020 ला खुला झाला असून येत्या 6 ऑक्टोबरला बंद होणार आहे.









