ऑनलाईन टीम / मुंबई :
मिरा भाईंदर येथे कोरोना विषाणूची बाधा झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या संबंधित नगरसेवकाला आठवडाभरापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मावली.
तसेच आठवडाभरापूर्वी यांच्या सोबत त्यांनी पत्नी, आई, भाऊ यांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारानंतर त्यांच्या पद्धतीला डिस्चार्ज देण्यात आला असून आई आणि भाऊ अजूनही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
संबंधित नगरसेवक मिरा भाईंदर महापालिकेत दोन वेळा निवडून आले होते. तर या अगोदर त्यांनी मिरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते. सध्या ते महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून कार्यरत होते. आमदार प्रताप सरनाईक यांचे विश्वासू म्हणून त्याची ओळख होती.