प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहेत. यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणखी एक २० केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. लवकरच या ऑक्सिजन प्लँटचे काम पूर्ण होईल. या ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्ह्यात एकूण ५१ हजार केएल क्षमतेचा ऑक्सिजन साठा उपलब्ध होईल.
दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयात सध्या २७० रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ३८५ बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात उपचारार्थी रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात यापूर्वी सहा केएलचे तीन ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले आहेत. तर सांगली शासकीय रुग्णालयात १३ केएलचा एक ऑक्सिजन प्लँट आहे. या ऑक्सिजन प्लँटच्या माध्यमातून आत्तापर्यंत 31 हजार केएल क्षमतेचा ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. त्यामध्ये आता 20 के.एलने वाढ होऊन 51 के.एलने ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.
दिलासादायक बाब म्हणजे सध्या मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण संख्या कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. ३८५ बेड क्षमता असलेल्या शासकीय कोरोना रुग्णालयात सध्या केवळ २७० रुग्ण उपचार घेत आहेत. तर दैनंदिन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणित कमी होत चालली आहे. यामुळे रुग्णालय कर्मचारी आणि प्रशासनावरील कामाचा ताण कमी झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








