शेती पिकांचेही मोठे नुकसान, द्राक्ष बाग उद्धवस्त
प्रतिनिधी/मिरज/सलगरे
मिरज शहरासह तालुक्याच्या पूर्व भागाला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वळीवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि तुफान वारा सुरू होतास प्रारंभी मोठ्या प्रमाण गारा पडल्या. तालुक्यातील आरग, बेडग, सलगरे, बेळंकी, कदमवाडी, चाबूस्कस्वारवाडी या गावात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. बेळंकी रस्त्यावरील खरड छाटणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने रस्त्यावर पांढरी चादर हांतरल्याचे चित्र होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. चारच्या सुमारास तुफान वादळी वारा सुटला. त्यामुळे पावसाचे ढग शहरातून ग्रामीण भागात सरकले. प्रारंभी ग्रामीण भागात गारा पडण्यास सुरुवात झाली. तर शहरात मोठ्या पावसाला सुरुवात झाली. शहरात काही ठिकाणी गारा पडल्या. सुमारे सव्वा तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. दरम्यान, या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यातून व्यक्त होते आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








