प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. मिरज-मालगांव रस्त्यावरील एकता कॉलनी येथे 20 ते 25 मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने संध्या शिवलिंग देवमाने वय 8 या बालिकेवर अचानक हल्ला करुन चावा घेतला. या कुत्र्यांच्या हल्ल्यात सदर बालिकेच्या सर्वांगाला विषारी दात लागून ती जखमी झाली आहे.
तिच्यावर सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिका कर्मचाऱ्यानी केवळ डॉगव्हॅनमधून प्रभागात पर्यटन करण्यापेक्षा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा सर्व मोकाट कुत्री महापालिकेत आणून सोडू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.