मिरज शहर सुधार समितीचे आंदोलन
मिरज/प्रतिनिधी
मिरज-मालगांव हा शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील वाढलेली नागरी वस्ती, वाहनधारकांची संख्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीने सोमवारी अमनगर येथे रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत या रस्त्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, मालगाव, टाकळी, बोलवाड, गुंडेवाडी, मल्लेवाडी, खंडेराजुरी, सलगरे, बेळंकी, पायाप्पाचीवाडी, कवठेमहांकाळ, सह कर्नाटकला जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कलावतीनगर, इंदिरानगर, पूर्व दत्त्त कॉलनी, पश्श्चिम दत्त्त कॉलनी, खोतनगर, महादेव कॉलनी, एकता कॉलनी, अमननगर, दर्गाह कॉलनी असे सुमारे 25 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले उपनगरे आहेत.
या रस्त्यावरील अनेक मालमत्त्ताधारकांनी नैसर्गिक नाला मुजवून अतिक्रमण करून घरे बांधले आहेत. अनेकांनी रस्त्यावरच वाळू, भंगार, लोखंड विक्रीचे डेपो (दुकाने) थाटली आहेत. रस्ता अरुंद झाल्याने दररोज अपघात घडत आहेत. याबाबत मिरज शहर सुधार समिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, अधिकारी केवळ वेळ मारून नेत असल्याने समितीने सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








