म्हैसाळ / वार्ताहर
येथील मिरज-बेडग रोडवरील कचरा डेपोस आग लागील. या आगीमुळे परीसरात धुरीचे लोट पसरल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार प्रदूषणचा धोका निर्माण झाल्याने शेतीसह उद्योग व्यवसायास धोका निर्माण झाला आहे. याबाबत दुपार पासून मिरजेहून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. तीन चार तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र धुराचे लोट पसरल्याने प्रदुषण वाढतच आहेत.
महापालिकेच्या निष्यकाळजीपणामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प सील करणार असून यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्व आपली जबाबदारी राहील असा इशारा वड्डी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमिरून करीमखान वजीर यांनी महापालिका उपा आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत तातडीने यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कचरा डेपोला कायमचा सील ठोकण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत काल रविवारी विजयनगर चे माजी सरपंच राजू कोरे यांनी ही आंदोलनाचा इशारा दिला होता.
Previous Articleसातारा : कडक लॉकडाऊनचे पोलीस अधीक्षकांचे संकेत
Next Article लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्रीच घेणार अंतिम निर्णय








