कसबे डिग्रज / वार्ताहर
मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज आणि कवठे पिरान मधील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 27 कोटी पेक्षा अधिकचा निधी देऊन दिलासा दिला आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून क्षारपड जमिनींचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकरी वर्ग चिंतीत होता. या क्षारपड जमीन सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नेतेमंडळी आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत कसबे डिग्रजमधील 471.88 हेक्टर साठी 7.18 कोटी तर कवठे पिरानच्या 1227.44 हेक्टर साठी 20.55 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या क्षारपड जमिनींचा प्रलंबित प्रश्न निकालात निघणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








