ऑनलाईन टीम / मिरज
कोरोनाचा आजार पसरल्यानंतर राज्यातील एक प्रमुख कोविड केंद्र म्हणून मिरज शासकीय रूग्णालयाची ओळख निर्माण झाली. या केंद्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांवर उपचार व तपासणी करण्यात येते. मात्र, याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मिळणारे नाष्टा आणि जेवण हे निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याचा आरोप रुग्णांनी केला असून, मिळणारे जेवणही पुरेसे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून देशभरात प्रसिध्द आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे देशभरातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. कोरोनाचा आजार सुरू झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील रुग्णांवर उपचार कोठे करायचा? असा प्रश्न शासनासमोर उभा ठाकल्यानंतर त्यांना प्रकर्षाने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या मिरज शहराचा पर्याय समोर आला. त्यामुळे मिरज शासकीय रुग्णालय हे कोरोना उपचाराचे केंद्र करण्यात आले.
मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणी करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभारण्यात आल्या. सर्वसोयींनी युक्त असे कोविड केंद्र तयार करण्यात आले. येथे दक्षिण महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार करण्यात येऊ लागले. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला. यामध्ये नाष्टा, जेवण, चहा व अन्य बाबींचा समावेश आहे.
मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णांना मिळणारे जेवण हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करीत आहेत. दररोज नाष्ट्याला तोच-तोच पदार्थ खाऊन रुग्ण कंटाळले आहेत. तो नाष्टाही चांगला नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तर दुपारी आणि रात्री मिळणारे जेवणही अपुरे आणि निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत रुग्ण आणि नातेवाईकांनी प्रशासनाला सांगूनही यात बदल झाला नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये रोष आहे. त्यांनी घरी सोडण्याची मागणी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








