प्रतिनिधी / मिरज
मिरज शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाने रविवारी मध्यरात्री चाकूने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केली. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हुसेन मोमीन हे मिरज – मालगांव रस्त्यावर अमननगर येथे राहण्यास आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मिरज कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ते कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन ठणठणीत झाले होते. नुकताच त्यांना डिस्चार्जही देण्यात येणार होता. मात्र, त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, मोमीन यांच्या नातेवाईकांनी या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे.
कोविड रुग्णालयात चांगले उपचार मिळाले नसल्याने कोरोनाच्या भीतीपोटी मोमीन यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, शासकीय रुग्णालय प्रशासनाने या आरोपाला पुष्टी दिली नाही. दरम्यान, मोमीन यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. कोरानामुक्त झालेल्या व्यक्तीने कोविड रुग्णालयातच गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








