प्रतिनिधी/मिरज
अतिवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या महापूरामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने या मार्गावर गेली काही दिवस ठप्प रेल्वे वाहतूक आजपासून पूर्ववत होत आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या पूर्ववत धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाने युध्द पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने अहोरात्र काम करीत या मार्गावरील भराव आणि दुरूस्ती अवघ्या 24 तासात पूर्ण केली. त्यामुळे आता या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत कोल्हापूरपर्यंत जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Previous Articleदिवंगत गणपतराव देशमुख यांना शेकापतर्फे श्रद्धांजली
Next Article इस्लामपुरातील बनावट दस्त प्रकरणी दोघांना सक्तमजुरी









