प्रतिनिधी / मिरज
पंचगंगा नदीला पूर येऊन कोल्हापूर रेल्वे मार्गावर पुलावरील भराव वाहून गेल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असून, 4 ऑगस्टपर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मिरज जंक्शनवरून सर्व एक्सप्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी दुपारी जाहीर केला. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील एक्स्प्रेस रेल्वे गाड्या पुढील चार दिवस मिरज जंक्शनवरून सुटतील.
मागील आठवड्यात कोल्हापूरातील पंचगंगा नदीला पूर आला होता. कोल्हापूर रेल्वे मार्गावरून ही नदी गेली आहे. नदीवर रेल्वे पूल आहेत. मात्र पुराचे पाणी जाऊन रेल्वे पुलावरील भराव वाहून गेला आहे. काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले होते. रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली होती. सातर्कतेची उपाययोजना म्हणून कोल्हापूर मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक तातडीने थांबविण्यात आली होती.
मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. युद्ध पातळीवर काम सुरू असून, चार ऑगस्टपर्यंत रेल्वे रुळांची दुरुस्ती पूर्ण होईल. या कालावधीत मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग चार ऑगस्ट पर्यंत बंद राहील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोल्हापुरातून धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या पुढील चार दिवस मिरज जंक्शन वरून सुटतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
या गाड्या मिरज जंक्शनवरून सुटणार
मध्य रेल्वे पुणे विभागाने कळविले आहे की, कोल्हापुर-गोंदिया, कोल्हापुर-मुंबई, तिरुपति-कोल्हापुर हरिप्रिय एक्स्प्रेस या गाड्यांसह धनबाद, अहमदाबाद, नागपुर , निज़ामुद्दीन या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या मिरज जंक्शनवरून सुटतील. कोल्हापूर मार्गावरील रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत गाड्या कोल्हापूर पर्यंत धावतील. तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








