प्रतिनिधी / मिरज
मिरज कृष्णा नदीच्या पाण्यात रविवारी दुपारी एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. विनय सज्जन सौदंडे (वय 24) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
सदर तरुण शंभर फुटी रोड हडको कॉलनी येथे राहण्यास आहे. रविवारी दुपारी तो नदीत पोहण्यासाठी आला होता. मात्र, तो वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत नदीच्या पाण्यात शोध मोहीम सुरू होती.








