प्रतिनिधी / सांगली
गेल्या अनेक वर्षांपासून मिरजकर नागरिकांची मागणी असलेले व पाच वर्षांपूर्वी मंजूर होऊन देखील अद्याप सुरु न झालेले मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुरेश खाडे यांच्याशी शनिवारी महारेलचे महाराष्ट्रातील विभागीय महाव्यवस्थापक (सिव्हिल) अजय हनवते व त्यांच्या सहायक अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाचे काम सुरु करण्याच्या दृष्टीने चर्चा केली
यावेळी भाजपचे अनुसूचित मोर्च्याचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे व भाजप जिल्हा सरचिटणीस व मध्य रेल्वेच्या पुणे विभाग रेल्वे समिती सदस्य मोहन वाटवे हे उपस्थित होते.








