प्रतिनिधी/मिरज
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संप आंदोलनाची कोंडी फुटण्याच्या मार्गावर आहे. महामंडळाकडून निलंबन केले जाणार असल्याचा धसका घेऊन काही कर्मचारी स्वत:हूनच कामावर परतू लागले आहेत.
मिरज आगारातील संपावर गेलेल्या 326 कर्मचाऱ्यापैकी रविवारी 30 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाल्याने मिरज आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. कर्नाटक सीमा भागासह सांगली, तासगांव, कवठेमहांकाळ, जत, कोल्हापूर, पुणे आणि पंढरपूर मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.








