प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगत असलेल्या मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 10 मधील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी भीषण आग लागल़ी भर दुपारी लागलेल्या या आगीमुळे पारिसरात धुराचे मोठय़ा प्रमाणावर लोट पसरले होत़े एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचल्याने अर्ध्या तासातच ही आग आटोक्यात आणण्यात आल़ी मात्र भंगार जळून खाक झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील वेरॉन कंपनी व रेल्वे ब्रीज दरम्यान भंगाराचे गोदाम आह़े याठिकाणी प्लास्टिक व इतर इलेक्टॉनिक वस्तूंचा मोठय़ा प्रमाणावर साठा ठेवण्यात आला होत़ा शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोदामातील कामगार जेवणासाठी बाहेर गेले होत़े याच दरम्यान येथील गोदामातील भंगाराला अचानक आग लागल़ी
भंगाराला लागलेल्या आगीने धुराचे लोट परिसरात पसरले होत़े तसेच सुकलेल्या गवताने देखील यावेळी पेट घेतल्याने बाजूला असलेली वॅरॉन कंपनी, स्वॉ मिल, रत्नागिरीमधील महत्वाच्या प्रिटींग प्रेस यांना धोका निर्माण झाला होत़ा मात्र सुदैवाने आग लागल्याच्या काही अवधीतच याठिकाणी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आल़े









