शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज, कोणतीही जीवितहानी नाही
प्रतिनिधी/मिरज
शहरातील दत्त चौक येथे आज, सोमवारी दुपारच्या सुमारास विद्युत ट्रान्सफार्मला अचानक भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आली असून, सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दत्त चौक येथे संपूर्ण ब्राह्मणपुरी भागाला वीज पुरवठा करण्यासाठी दत्त मंदिरासमोर 11 केव्हीचे विद्युत ट्रान्सफार्मर आहे. दुपारच्या सुमारास या ट्रान्सफार्मरमध्ये मोठा आवाज झाला. बघता बघता आगीच्या ठिणग्या पडू लागल्या. काही क्षणात मोठी आग लागली. मुख्य चौकातच हा प्रकार घडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अग्निशमन विभागाचे एक बंब दाखल झाले. फायर ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








