17 पोत्यांमध्ये पाच लाखांचा गुटखा, वाहतकीचा टेंपोही जप्त
प्रतिनिधी/मिरज
शहर आणि परिसरात गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. रविवारी एका टेंपोतून वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गुटखा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केला आहे. नेमकी ही कारवाई शहरात कोठे झाले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, गुटख्याची एकूण 17 पोती मिळून आली आहेत. यामध्ये चार लाख, 59 हजार, 680 रुपयांचा गुटखा मिळून आला आहे. आरएमडी गुटख्याचे आणखी काही बॉक्स असून, त्याची मोजदाद सुरू आहे. जप्त केलेल्या या गुटख्याची किंमत लाखो रुपये आहे. एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून रविवारी सकाळच्या सुमारास (एमएच-10-सीक्यू-0878) हा टेंपो संशयास्पदरित्या जात होता. त्यावेळी पोलिसांनी सदर टेंपो आडवून झडती घेतली असता, त्यामध्ये बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, आरएमडीचे बॉक्स मिळून आले. सदर गुटखा हा पोत्यांमध्ये होता. पोलिसांनी टेंपो जप्त करुन गांधी चौकी पोलिस ठाण्यात नेली. तेथे टेंपोतून पोती बाहेर काढली असता, 17 पोत्यांमध्ये गुटखा मिळून आला. यामध्ये प्रत्येकी पोत्यात 27 हजार 40 रुपयांचा गुटखा होता. 17 पोत्यांमधून एकूण चार लाख, 59 हजार, 680 रुपयांचा गुटखा मिळून आला. अद्याप गुटखा साहित्याची मोजदाद सुरु असून, या गुटख्याची ऐकूण किंमत लाखोंच्या घरात आहे. हा गुटखा कोणाचा आहे, टेंपोतून कोठून घेऊन आला, टेंपो कोठे चालला होता, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयीत टेंपो चालकाला ताब्यात घेतले असून, टेंपोही जप्त केला आहे.
Previous Articleसातारा : प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उद्यापासून लसीकरण
Next Article भारत जगासाठी औषधी केंद्र : पंतप्रधान मोदी








