प्रतिनिधी / मिरज
राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी विनायक ओमप्रकाश पांडे (वय 40, सध्या रा. सिध्देवाडी, मुळ गांव भोपाळ) यांना एका रिक्षा चालकाने आणि मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी लुबाडले. रिक्षा चालकाने त्यांची बॅग काढून घेतली. तर मोटारसायकलवरील दोघांनी खिशात जबरदस्तीने हात घालून धमकी देत एक हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.









