प्रजासत्ताक दिनादिवशी ड्रायडेला बेकायदेशीर विदेशी दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा
प्रतिनिधी / मिरज
मिरजेत प्रजासत्ताक दिनादिवशी ड्राय डे दिवशीच वडर गल्ली माधव पेठ येथे बेकायदेशीर विदेशी दारू विक्री अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 23 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजू कलगुटगी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील वडर गल्ली याठिकाणी ड्राय डे दिवशी खुलेआम दारू विक्री सुरू होती. याबाबत मिरज शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने छापा टाकून खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्री अड्ड्यावर कारवाई केली आहे. शहरातील या भागात सर्रास खुलेआम दारू विक्री करण्यात येत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे