प्रतिनिधी/मिरज
शहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्वामी विवेकानंदनगर येथे बंगला फोडून चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अमित नामदेव फाकडे (वय 35) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
अमित फाकडे हे व्यवसायाने इंजिनिअर असून, मिरज-पंढरपूर रस्त्यावरील साळुंखे महाविद्यालयाच्या पाठीमागे स्वामी विवेकानंदनगर येथे शार्दुल निवास नावाने बंगला आहे. एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी फाकडे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममध्ये ठेवलेले दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, अडीच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम असा साडेसात हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.
फाकडे हे घरी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचा दिसला. त्यांनी आत जावून पाहणी केली असता, घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, शहर आणि परिसरात गेल्या आठवडाभरापासूनच घरफोडय़ा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मागील आठवडय़ातच रमा उद्यान येथे बंगला फोडून चोरटय़ांनी सुमारे 30 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. आता पुन्हा बंगला फोडून चोरुन झाल्याने शहरात घरफोडय़ा टोळ्यांचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. चोरटय़ांनी बंद बंगल्यांनाच टार्गेट केल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








