गांधी चौक पोलिस आणि औषध निरीक्षकांचा छापा
प्रतिनिधी/मिरज
नशेखोर तरुणांना नशेच्या गोळ्या विकणाऱ्या शहरातील सांगली – मिरज रस्त्यावरील आयुष मेडिकलवर महात्मा गांधी चौक पोलिस आणि औषध निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्किपशन शिवाय या गोळ्या विक्री होत असल्याचे आढळले आहे. या कारवाईमुळे अन्य मेडिकल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
रेल्वे स्टेशन आणि स्टँड परिसरात गेल्या काही दिवसांपासून नशेखोर तरुणांच्या टोळ्या सक्रीय झाल्या होत्या. दारू, गांजा, नशेच्या गोळ्या आणि व्हाइटनरची नशा करणारे तरुण या भागात वावरत असतात. या नशेखोरांकडून अलीकडे प्रवाशांना व स्टेशन परिसरातील दुकादारांना लुबडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या नशेखोरांचा बंदोबस्त करण्यासह त्यांना नशेच्या गोळ्या आणि गांजा पुरविणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात होती.
गांधी चौकी पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक स्टेशन चौकात पेट्रोलिंग करत असताना एक तरुण नशेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ नशेच्या गोळ्यांचे चार पाकीट अशा एकूण 40 गोळ्या मिळून आल्या. या गोळ्यांबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गोळ्या नशेच्या असून, त्या सांगली-मिरज रस्त्यावरील वंटमुरे कॉर्नर येथील आयुष्य मेडिकल मधून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविराज फडणीस आणि औषध निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने सदर मेडिकलवर छापा टाकून टाकला. यावेळी सदर मेडिकल चालकाने डॉक्टरांची कोणतीही प्रिस्कीपशन न घेता नशेच्या गोळ्या दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर मेडिकल चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








