प्रतिनिधी/मिरज
शहर आणि परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. नागेश दत्ता माने (रा. कैकाडी गल्ली मिरज) आणि नासीर दस्तगीर मुजावर (रा म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना सदर दोघे आरोपी संशयास्पदरीत्या मोटरसायकल घेऊन थांबल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शहरात विविध ठिकाणी चार मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांकडून (एमएच १० सीडी ९४४०), (एमएच १० टी ४९६५) हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एमएच १० एक्स ४८३६) टी.व्ही.एस. फिआरो आणि (एमएच १० डीयु ०४२४) बजाज डिस्कवरी अशा चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








