फेसबुक पोस्टवरुन वाद झाल्याने नाचविल्या तलवारी, सात जणांच्या टोळीचे कृत्य
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारापासून काही फुटांच्या अंतरावर अज्ञात सात जणांच्या टोळीने दोघा तरुणांवर धारदार कोयत्याने खुनी हल्ला केला. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. युनूस नदाफ आणि इम्रान नदाफ हे दोघे जखमी झाले आहेत. फेसबुकवर पोस्ट टाकल्यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. हल्ला करणारे सात जण सांगलीतील आहेत.
हल्लेखोरोरांनी पळ काढला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या मुख्य चौकात गजबजलेल्या ठिकाणीच हा खूनी हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. खूनी हल्ला झाल्यानंतर या चौकातील सर्वच दुकानदारांनी आपले दुकानांचे शटर बंद केले. या घटनेनंतर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जखमींना सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.








