प्रतिनिधी/मिरज
शहरातील कृष्णाघाट रस्त्यावर हंडीफोड मळ्यात उसाच्या फडाला आग लागून सुमारे तीन एकर ऊस जळून घाक झाला. आठ एकर क्षेत्रातील उसाच्या फडाने पेट घेतला होता. अग्निशमन विभागास माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दोन वाहनांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर पावणे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोवर आठ एकरपैकी तीन एकरावरील उढस जळून गेला होता.
Previous Articleकराड : वेग नियंत्रणासाठी वाहनांवरील कारवाईत सातत्य ठेवा
Next Article करदात्यांना आयकर विभागाकडून 1.91 लाख कोटींचा परतावा








