प्रतिनिधी/मिरज
विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी (गट ड) महासंघाच्या तीन दिवसीय राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली असून, या आंदोलनास सांगली जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाने पाठिंबा दर्शविला आहे. आज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून रुग्णालयासमोर निदर्शने केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी 27 तारखेपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस होता. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी कळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. दुपारच्या सत्रात काम बंद आंदोलन करून रुग्णालयासमोर निदर्शने केली. संघटनेचे पुणे विभागाचे उपसचिव व सांगली जिल्हा अध्यक्ष संजय व्हनमाने व जिल्हा सचिव गणेश धुमाळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
Previous Articleसांगली : भाजप गटनेतेपदी विनायक सिंहासने
Next Article शाळा सुरू झाल्या आणि शिराळा बस स्थानक गेले गजबजून








