दोन लाखांचे नुकसान, संसारोपयोगी साहित्य नष्ट
ऑनलाईन टीम/मिरज
गेली दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने शहरात दैना उडाली आहे. रेवणी गल्ली येथील खंदकालगत असणारे शिवाजी कुरणे यांचे घर बुधवारी सायंकाळी अचानक कोसळले. यामध्ये उषा तुकाराम आवळे (वय 60), सुनिता अशोक माळी (45) या दोन महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी माती उपसून त्यांना बाहेर काढले. मातीच्या ढिगाऱ्याखाली संसारोपयोगी साहित्य अडकल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. खंदकातील भाजी मंडईसाठी केलेल्या खुदाईमुळे सदरचे घर कमकुवत होऊन पडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रेवणी गल्ली येथे मिरज किल्ल्याच्या खंदकालगत अनेक घरे आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे सध्या भाजी मंडईसाठी खुदाई करण्यात आली आहे. याच ठिकाणी शिवाजी कुरणे यांचे घर 30 फुट उंचीवर खंदकाच्या काठावर आहे. गेली दोन दिवस शहर आणि परिसरात संततधार पाऊस पडत आहे. शिवाजी कुरणे यांच्या घराच्या भिंती मातीच्या असल्याने दोन दिवस पडलेल्या पावसाने पाणी झिरपूर कमकुवत बनल्या होत्या.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक खंदकालगत असणारी भिंत आणि जमीनीचा भाग 30 फुट खाली खंदकात कोसळला. यामध्ये या खोलीत बसलेल्या उषा आवळे आणि सुनिता माळी या दोन महिला 30 फुट खोल असणाऱ्या खंदकातील पाण्यात पडल्या. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मातीचा ढिगारा उपसून दोन महिलांना बाहेर काढले. यामध्ये उषा यांचा हात मोडला आहे.
खंदकालगतच्या या घरात टीव्ही, शोकेस, गॅस, भांडय़ाचे कपाट, पलंग, कपडे यासह संसारोपयोगी साहित्य होते. ते सर्व 30 फुट खाली मातीच्या ढिगाऱ्यातत गाडले गेले. त्यामुळे कुरणे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील कपडय़ांसह अंथरुन पांघरुनही ढिगाऱ्याखाली गेल्याने ऐन पावसात कुरणे कुटुंबिय उघडय़ावर पडले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








