प्रतिनिधी/मिरज
मिरजेत पंढरपूर रोडवरील बसवेश्वर उद्यानाजवळ गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या बबलू उर्फ मारुती श्रीमंत गलांडे (वय 30, रा. विठ्ठलनगर, जत) या तरुणास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 55 हजार, 300 रुपयांचे देशी बनावटीचे मॅगझिन असलेले पिस्तूल, एक जीवंत काडतूस जफ्त करण्यात आले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.








