शेतकरी आंदोलनाचे समर्थन, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी
प्रतिनिधी / मिरज
केंद्र शासनाने आणलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी धरणे धरुन काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी राजधानी दिल्लीतील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
आम आदमीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा सचिव निसार मुल्ला, विनोद मोरे, संग्राम यमगर, फैय्याज सय्यद, उपाध्यक्ष अरिफ मुल्ला, तालुकाध्यक्ष सागर भोसले, शोयब कापशीकर, जावेद अत्तार, तौफिक अत्तार, सतिश मोरे, परवेज पटेल, झोयेब मुल्ला, रविंद्र बनसोडे, श्रीकांत चंदनवाले आदी कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात भाग घेतला.