ऑनलाईन टीम/मिरज
कोरोनाची व्याफ्ती आता शहरातून ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. सांगली शहर वगळता मिरज शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात एकाच दिवशी कोरोना बाधित रुग्णांची सेंच्यूरी पार केली. शहरात एकाच दिवशी 68 रुग्ण तर ग्रामीण भागात 34 असे 102 नवे रुग्ण आढळून आले. मिरज पंचायत समितीच्या एका सदस्यालाही कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात ब्राम्हणपुरीतील एका 58 वर्षीय व्यक्तीचा कोरानाने मृत्यू झाला.
गुरूवारी भोसेमध्ये एकाच ठिकाणी नऊ, बेडग येथे बँक व्यवस्थापकाच्या संपर्कात आलेले तिघे, भोसे, वड्डी, सलगरे, कर्नाळ, हरिपूर, दुधगांव, कवठेपिरान या गावातही रुग्ण आढळले. सलगरे येथे एका निवृत्त जवानासह दोघांना कोरोनाची लागण झाली. अंकली येथे सात रुग्ण आढळले आहेत. तर आरग येथे तीन रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात वाढणारी ही कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक बनली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या पंचायत समितीच्या एका सदस्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
शहरात महापालिकेच्या वतीने दररोज ऍन्टीजेन टेस्ट सुरू असल्यामुळे नवे रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी एकाच दिवशी 68 रुग्ण आढळले आहेत. मिरज शहरात एवढया मोठ्या संख्येने प्रथमच रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या ब्राम्हणपुरी येथील एका 58 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 13 वर पोहचली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








