पडळकरांच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन
प्रतिनिधी/मिरज
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तैलचित्रावर दुग्धाभिषेक करीत सोमवारी पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. पडळकर यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला. पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने राज्यभरात पडळकर यांच्या विरोधात आंदोलनाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याबरोबर जोडेमार आंदोलन करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.
एकीकडे पडळकरांच्या विरोधात आंदोलने सुरू असताना मिरज पंचायत समितीमधील भाजपाच्या सदस्य आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांच्या नेतृत्वाखाली धनंजय कुलकर्णी, महादेव दबडे, मयुर नायकवडी, प्रविण कोरे, अनिल लोखंडे, अजित शेजूळ, बाळगोंडा नाईक यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर एकत्र येत पडळकर यांच्या तैलचित्रावर दुग्धाभिषेक केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








