प्रतिनिधी/मिरज
मिरज शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट लॅबमधून पहिल्या नमुना चाचणीला पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) संस्थेकडून मान्यता मिळाली असून, या लॅबमध्ये आता स्थानिक पातळीवरच कोरोना रुग्णांची तपासणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर प्रथमच मिरजेत हे लॅब सुरू झाले असून, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सिंधुदूर्ग या पाच जिह्यातील कोरोना बाधित रुग्णांची येथे टेस्ट केली जाणार आहे.
दोन दिवसांपर्वी या लॅबमधून काही जणांची तपासणी करण्यात आली होती. पुणे येथील एनआयव्ही लॅबकडे चाचणीसाठी अहवाल पाठविला होता. ही चाचणी योग्य असल्याचा अहवाल देत एनआयव्ही संस्थेने मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट घेण्यास हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांच्या चाचण्या पुण्यात न पाठविता मिरजेतच त्याचा अहवाल तयार होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकजणांचे कोरोना चाचणी अहवाल विनाविलंब स्थानिक पातळीवरच प्राफ्त होणार आहेत. या लॅबमध्ये डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी, डॉ. संदीप वाळुजकर हे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
या लॅबमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिह्यातील संशयीत कोरोना रुग्णांचे रिपोर्ट तपासणी होणार आहेत. मिरजेत तयार झालेली ही कोरोना टेस्ट लॅब राज्यातील पुण्यानंतरची पहिलीच अद्ययावत लॅब आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








