तटरक्षक दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून निवड : भारतीय समुद्र किनाऱयाच्या रक्षणाची जबाबदारी
प्रतिनिधी/मिरज
सुमारे सात हजार किलोमिटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेल्या भारतीय भूमीचे समुद्री शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी घारीच्या नजरेने डोळ्यात तेल घालून सदैव सज्ज असणाऱया भारतीय तटरक्षक दलात मिरजेच्या कार्तिक पोपटराव सातपूते या 28 वर्षाच्या सुपूत्राने स्थान मिळविले आहे. हेलिकॉप्टर पायलट म्हणून अवकाशातून भारतीय समुद्र सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी कार्तिक सांभाळत आहेत. सामान्य कुटुंबातील या तरुणाची ही अवकाश भरारी तरुणांना प्रेरणादायी ठरली आहे.
`मिरासाहेबांची पांढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया मिरज शहरात सातपूते घराण्याला विशेष स्थान आहे. संपूर्ण देशात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिध्द असलेल्या मिरासाहेब दर्ग्याच्या पहिल्या गलेफाचा मान सातपूते घराण्याला आहे. याच घराण्यातील एका तरुणाने आपल्या कर्तृत्वाने वेगळी उंची गाठली आहे. कार्तिक सातपूते असे या तरुणाचे नाव आहे. अवघ्या 28 व्यावर्षी तटरक्षक दलात सेकंड कमांडन्टची रँक मिळविणाऱया या तरुणाने अवकाश भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि जिद्द, परिश्रमाच्या बळावर ते सत्यातही उतरवून दाखविले. हा तरुण आता तटरक्षक दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून दाखल होणार आहे.
वडील पोपटराव सातपूते हे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान. तर आई सौ. विद्या या गृहिणी. वडिलांच्या देशभर बदल्या होत. त्यांच्याबरोबर कार्तिक आणि त्यांचा भाऊ राहूल यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली, हैद्राबाद, पुणे येथे झाले. केंद्रीय विद्यालयात धडे घेतलेल्या कार्तिक याने पुणे येथील सिंहगड इन्स्टीटÎूटमध्ये मेपॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठÎा पॅकेजची नोकरी सहज मिळाली असती. मात्र, वडिलांकडून देशसेवेचा वारसा मिळाल्याने त्याने तटरक्षक दलात दाखल होण्याचे ध्येय महाविद्यालयीन जीवनातच निश्चित केले. या ध्येयपूर्तीसाठी बरेच कष्ट घेतले. अखेर 25 डिसेंबर 2015 रोजी तो तटरक्षक दलात दाखल झाला. तटरक्षक दलातील वेगवेगळ्या अग्निपरीक्षा पार करीत तीन-चार वर्षातच तो सेकंड कमांडंन्ट रँकपर्यंत पोहोचला. मात्र, त्याला तेथेही काही तरी वेगळे करुन दाखविण्याची उर्मी होती. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टर पायलट बनण्याचे ठरविले. सुमारे एक वर्षांच्या खडतर परिक्षेतून तो आता हेलिकॉप्टर पायलट झाला आहे.
तटरक्षक दल हे शेकडो किलोमिटरचा समुद्र किनारा लाभलेल्या भारतीय भूमीचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेले दल आहे. या दलातील जवान घारीच्या नजरेप्रमाणे सदैव डोळ्यात तेल घालून सज्ज असतात. समुद्री किनाऱयावर जहाजातून आणि आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे हे जवान सागरी किनाऱयांचे रक्षण करतात. याच दलात आता कार्तिक सातपूते दाखल झाला आहे. हेलिकॉप्टर पायलट म्हणून आव्हानात्मक जबाबदारी त्याच्याकडे आली आहे. तटरक्षक दलाचे हे निडर जवान केवळ सागरी किनाऱयांचेच रक्षण करीत नाहीत, तर ज्या-ज्यावेळी देशात महापूर, भूकंप किंवा अन्य मोठÎा दुर्घटना घडतात, त्यावेळी हे जवान प्रशासनाच्या सूचनेनुसार हेलिकॉप्टर घेऊन त्याठिकाणी मदतीसाठी धावून जातात. त्यामुळेच कार्तिक सातपूते यांनी हेलिकॉप्टर पायलटची आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली आहे. सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत कार्तिक सातपूते यांनी घेतलेली ही अवकाश भरारी तरुण पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे.