वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया (अमेरिका)
ऑस्ट्रीयाचा टेनिसपटू 28 वर्षीय डॉमिनिक थिएम दुखापतीमुळे आगामी होणाऱया इंडियन वेल्स आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही. सदर घोषणा मियामीने सोमवारी केली.
थिएमला गेल्या वर्षभराच्या कालावधीत मनगटाला झालेल्या दुखापतीने चांगलेच दमविले आहे. या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सहभागी होवू शकला नाही. गेल्या जूनपासून तो टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहिला आहे. माजी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेत्या थिएमने एपीटी चषक, सिडनी टेनिस क्लासिक स्पर्धेत सहभाग दर्शविला नाही.









