वृत्तसंस्था/ मियामी
चालूवर्षी होणाऱया एटीपी टूरवरील मियामी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू जोकोव्हिकने सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे.
आपल्या कुटूंबियासमवेत काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला असल्याने आपण मियामी स्पर्धेत सहभागी होवू शकत नाही, असे जोकोव्हिकने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. एटीपी टूरवरील मियामी मास्टर्स 1000 दर्जाच्या या स्पर्धेत आतापर्यंत जोकोव्हिकने सहावेळा विजेतेपद मिळविले आहे. 2021 च्या टेनिस हंगामामध्ये टॉप सीडेड जोकोव्हिकने विविध स्पर्धांमध्ये नऊ सामने जिंकले आहेत.









