अल्प मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरातही कपात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) महिन्याभरात दुसऱयांदा मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज दरात कपात केली आहे. बँकेने 45 दिवसांपर्यंतच्या अल्प मुदत ठेवीवरील व्याज 0.50 टक्क्यांनी कमी केले असून, 10 मार्चपासून हा बदल लागू झाला आहे. याशिवाय बचत खात्यावरील व्याज 3 टक्के केले असून, बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) राखण्याची आवश्यकता नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. बँकेच्या या निर्णयामुळे 44.51 कोटी बचत खातेधारकांवर याचा परिणाम होणार आहे.
नव्या दरांनुसार, 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर 4 टक्के व्याज देण्यात येणार आहे, जे यापूर्वी 4.50 टक्के होते. याशिवाय, एक वर्षाच्या किंवा त्याहून अधिक कालावधीच्या ठेवीसाठी व्याज दरात 0.10 टक्के कपात केली गेली आहे. पूर्वी यावर 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत होते. सध्या एसबी खात्यात 1 लाख रुपयांपर्यंतच्या जमा रकमेवर 3.25 टक्के आणि 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर 3 टक्के व्याज आहे.
बँकेने 46 ते 179 दिवस, 180 ते 210 दिवस आणि 211 दिवस ते एक वर्ष कालावधीच्या ठेवीवरील व्याज दरात कोणताही बदल केला नाही. मात्र, बँकेने एमसीएलआरमध्ये 15 बीपीएस कपात केली आहे.
एसबीआय निवृत्तीवेतनधारक आणि कर्मचाऱयांना हा लाभ
एसबीआयचे कर्मचारी किंवा एसबीआयचे निवृत्तीवेतनधारकांना निश्चित खात्यात जमा झालेल्या रकमेवर वर नमूद केलेल्या व्याज दरापेक्षा 1 टक्के अधिक व्याज मिळेल. याशिवाय एसबीआय कर्मचाऱयांसह ज्ये÷ नागरिकांना 1 टक्के व्याज तसेच 0.50 टक्के व्याज या दोन्हीचा लाभ मिळेल.









