वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या मिताली राजने एका स्थानाची प्रगती करीत दुसरे स्थान मिळविले असून स्मृती मानधनाने आपले सहावे स्थान कायम राखले आहे.
विंडीज आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील झालेल्या चार सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विंडीजच्या अष्टपैलू मॅथ्यूजची कामगिरी दर्जेदार झाल्याने तिने गोलंदाजाच्या यादीत 11 वे स्थान मिळविले आहे. विंडीजच्या अनिसा मोहम्मदने 25 वे स्थान तर शकिरा सेलमनने 26 वे स्थान घेतले आहे. शॅमिलिया कॉनेलने 29 वे स्थान पटकाविले आहे.
फलंदाजांच्या ताज्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिलीने पहिले स्थान तर मिताली राजने दुसरे तसेच लिझेली लीने तिसरे स्थान घेतले आहे. लिझेलीचे स्थान दोन स्थानांनी घसरण झाली आहे. मानधनाने सहावे स्थान कायम राखले आहे.









