प्रतिनिधी /पणजी
काही महिन्यापूर्वीच काँग्रेसमध्ये गेलेल्या माजीमंत्री मिकी पाशेको यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत पर्वरीतील ऍड. शंकर फडते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मिकी पाशेको हे नुवे मतदार संघातून तर ऍड. शंकर फडते हे पर्वरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, ऍ. अविनाष बोसले, व अन्य पधादीकारी यावेळी उपस्थित होते. झुजे फिलीप डिसोझा यांनी मिकी पाशेको व शंकर फडते यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. येवीळी बोलताना ते म्हणाले की मिकी पाशेको हे आमचे चांगले स्नेही असून मुळात ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते. मध्यांतराच्या काळात ते वेगळे झाले होते. आता पुन्हा ते राष्ट्रवादी पक्षात येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागत करीत आहोत. गोव्यात सध्या गलीच्छ राजकारण सुरु असून राष्ट्रवादी पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे जो नितिमत्ता आणि आपली तत्वे सांभाळूनच पुढे जात आहे असेही झूजे फिलीप डिसोझा म्हणाले.
काँग्रेस पक्षात गटबाजी सुरु झालेली असून पक्षाच्या हिताबाबत प्णालाच देणेघेणे नाही. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी धडपडत आहेत. असे मीकी पाशेको यांनी सांगितले. कँग्रेसचे सध्या सुरु असलेले प्रकार पाहिल्यास ते स्वतः सत्तेत येण्यासाठी धडपडत नसून भाजपला सहकार्य करण्याचे काम करीत आहे असे दिसून येत आहे, त्यामुळे काँग्रेस आणि भाजप म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असेही पाशेको म्हणाले. भाजपाने सध्या निधर्मी लोकांना संपवीण्याचा घाट घातला आहे. सरळ लढतीत भाजपाला ते शक्य होणार नाही. म्हणून त्यांच्या अदानी सारख्या हितचिंतकांनी मागल्या दाराने आप, तृणमूल सारख्या पक्षाना आणून गोव्यात सोडले आहे. केवळ मतांची विभागणी व्हावी आणि भाजपला संधी मिळावी हाच त्यांचा हेतू आहे असेही पाशेको यांनी सांगितले.
सध्या स्थितीत पर्वरीची स्थिती बिकट बनली असून केवळ बिल्डर लॉबीतीलच लोकच पर्वरीत आमदार होऊ पाहत आहेत. केवळ जमीनी लुटणे हाच त्यांचा उद्देश असतो असे ऍड. शंकर फडते यांनी सांगितले. त्यांच्या दादागिरीला कंटाळून सर्वसामान्य लोक निवडणुकीच्या भानगडीत पडत नाहीत. एकदा आमदार झाले की जमीनींची लुबाडणूक करायला ते मोकळे होतात असेही फडते म्हणाले.









