बेंगळूर
मिंत्रा या ऑनलाइन विक्री पोर्टलमध्ये गेल्या सेलमध्ये 50 लाखपेक्षा अधिकच्या वस्तुंची ऑर्डर प्राप्त केली गेली आहे. आपल्या 13 व्या सत्रात कंपनीने 1.1 कोटी हून अधिकच्या वस्तुंची विक्री केली आहे. मागच्या वर्षीच्या हिवाळय़ातील सेलच्या तुलनेत यंदा 51 टक्के अधिक प्रतिसाद ग्राहकांनी दर्शवला आहे. जवळपास 32 लाख खरेदीदारांनी या सेलमध्ये भाग घेतला होता. 19 हजारहून अधिक वस्तु प्रतिमिनीटाला पुरवठय़ाचा विक्रमही केला आहे.









