मुंबई
मागच्या वषी देशामध्ये शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱयांनी जवळपास 41 टक्के अधिक डिमॅट खाती उघडली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या 10.4 कोटीवर पोहोचली आहे. मागच्या वषी ती 7.4 कोटी इतकी होती. एकंदर यंदा डिमॅट खाते उघडणाऱयांची संख्या तशी कमीच दिसते आहे. यासंदर्भातला माहितीचा अहवाल मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल यांनी सादर केला. गेल्या ऑगस्टपासूनच डिमॅट खात्यांची संख्या सलगची घटताना दिसते. ऑगस्टमध्ये 26 लाख नवी खाती सुरू. त्यानंतर 20 लाख सप्टेंबर व ऑक्टोबर 18 लाख नव्या खात्याची सुरुवात झाली.









