बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित 22 व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी ज्योती होसट्टी यांनी 2 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्यपदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे.
विजयनगर ऍक्वेटीक सेंटर, कार्पोरेशन जलतरण तलाव बेंगलुर येथे झालेल्या 22 व्या राज्यस्तरिय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या ज्योती होसट्टी यांनी 100 मीटर बॅक स्ट्रोक व 100 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक, 200 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दोन रौप्य पदके, 50 मीटर बॅकस्ट्रोक व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक तर 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्यपदक पटकावित यश संपादन केले आहे. ज्योती होसट्टी बेळगावच्या आरोग्य खात्याच्या कर्मचारी असून, यापूर्वीही त्यांनी अनेक जलतरण स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.









