बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केरळमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहून कर्नाटकातही हे घडणे अपरिहार्य आहे, म्हणूनच आम्ही परिस्थिती हाताळण्यास तयार आहोत, असे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हंटले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील जनतेने कोरोना विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जनतेला सहकार्य करण्यासाठी आणखी काही दिवस दिले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा मास्क न घातल्याबद्दल आणि सामाजिक अंतर न राखल्याबद्दल दंड वाढवू शकतो, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले.









