वार्ताहर / देवरुख
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क बांधणे अत्यावश्यक असताना काही नागरिक मास्क न बांधताच फिरत असल्यामुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेवून अशा नागरिकांवर नगर पंचायत प्रशानाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
अत्यावश्यक सेवा सुविधा मिळवण्यासाठी देवरुख बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीच्या ठिकाणी सेवा देणारे व सेवा घेणारे काही नागरिक मास्क न बांधताच वावर करताना दिसून येत आहे. प्रशासनाने वारंवार सूचित करुनही मास्क बांधण्याकडे काहीजण दुर्लक्ष करीत असून त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. नगर पंचायत प्रशासनाने बाजारपेठेत फिरुन मास्क न बांधणाऱयांना समज दिलीच आहे. मात्र मोठय़ा प्रमाणात जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत नियम पाळले जाणार नाहीत. त्यामुळे कारवाई कडक, नियम न पाळणाऱयांना धडक दिल्याशिवाय त्यांना गांभीर्य कळणार नाही, असे बोलले जात आहे.









