बेळगाव / प्रतिनिधी :
माळी गल्ली युवक मंडळ यांच्यावतीने व प्रसाद होमिओपॅथिक यांच्या सहकार्याने गुरुवारी डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर येथील थळ देवस्थानात पार पडले. प्रारंभी शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, अंगणवाडी शिक्षिका पूनम हलगेकर, गंगु गोपन, सुमिता वांदे उपस्थित होत्या.
यावेळी किरण गावडे यांनी, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, सर्वांनी मास्क घालून घराबाहेर पडावे, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, गौरव कल्याणकर, भाऊराव कित्तुरकर, प्रतिक बडमंजी, मदन लोहार, भूषण हेब्बाळकर, विनोद लोहार, संतोष हेब्बाळकर, मिलिंद बामणेकर, सचिन कदम, साहिल पाटील, अभिजित लंगरकांडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









