काळ्या रानासाठी अजून एका पावसाची गरज
सोलापूर / प्रतिनिधी
मान्सूनपूर्व पावसानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर एकच पाऊस पडल्यामुळे शेतकरी माळरानावर पेरणी करण्याचे प्रमाण जास्त आहे. तर काळ्या रानासाठी काही शेतकरी आणखी एका चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र पुढे येणाऱ्या काळात पावसाने उघड दिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावे लागणार आहे. तरीही यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी खरीप पिकांची पेरणी करीत आहे. यामध्ये तूर, भुईमूग, उडीद, सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणीला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने या वर्षी चांगला पाऊस होणार आहे. असा अंदाज आर्तविल्यामुळे शेतकरी जमिनीनुसार पिकांची पेरणी करीत आहेत. भारी प्रकारच्या जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात. त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येते म्हणून यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखे पिके घेता येतात. तर हलक्या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागत असल्याने शेतकरी जमिनीनुसार योग्य त्या पिकांचे नियोजन करीत आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. परंतु शेतकऱ्याने जमिनीतील ओलावा किती आहे. शेतात कोणते पीक चागले येते हे पाहावं, नंतरच पेरणीला सुरवात करावी, बी-बियाणे यांची निवड करताना किंवा प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे जास्त खाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. बियाणी अधिक खोल गेल्यास पाऊस जोराचा आला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. पेरणी करताना पिकांची निवड आणि पेरणीचा काळ याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये कमी काळाची पिके सुरवातीला पेरावी. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आहे. तर दीर्घकालीन पिकांमध्ये कापूस, तूर अशी पिके असून ती थोड्या उशिराने पेरली तर चालू शकणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी सांगितले आहे.
बियाणे चांगल्या पध्दतीचे निवडावे
बियाण्याची निवड करताना जमिनीचा प्रकार आणि पाऊसचे पाणी यांचा विचार करुन योग्य ते बियाणे खरेदी करावेत. कमी कालावधीत व मध्यम येणारे बियाणे बाजारात आहेत. यासाठी कृषी अधिकारी यांचा सल्ला घेऊन बियाण्याची निवड केल्यास त्याचा फायदा होतो. -रोहीत थोरात, कृषि सहाय्यक, दर्शनाळ
खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. मंगळवारी चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे माळरानावर तूरची पेरणी करीत आहे. माळरान असल्याने कमी पावसामध्ये तूर पीक येते. मात्र काळ्या रानात अजून पेरणी करण्यासारखा पाऊस झाला नाही. आणखी एक मोठा पाऊस पडला तर काळ्या रानात मूग, उडीद, भुईमूग आदी पिकाची पेरणी करता येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








