क्रीडा प्रतिनिधी :
माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित माळमारूती चषक खुल्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला गुरूवारी युनियन जिमखाना मैदानावर मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनच्या सामन्यात माळमारूती अ संघाने माळमारूती ब संघावर 3 गडी राखून विजय मिळविला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्रृत चिट्सचे चेअरमन चंदन कुंदरनाड, अध्यक्ष शिवांनद फुटाणे, राघवेंद्र दैवज्ञ, ऍड. सुधीर सकरी, ऍड. हणमंत कोंगाळी, ऍड. एन बी. पाटील, रमेश पट्टणशेट्टी, हरिश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्याचे स्वागत शिवानंद फुटाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते यष्टी पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी रवि कणबर्गी, वैष्णव संगमित्रा, दीपक राक्षे, प्रविण उपस्थित होते.









