क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित माळमारुती क्रिकेट क्लब पुरस्कृत माळमारुती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीत होणार आहे. सदर स्पर्धेत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड विभाग क आणि ड विभागातील बेळगाव जिह्यातील खेळाडूंना भाग घेता येणार आहे.
युनियन जिमखानावर झालेल्या कार्यक्रमात माळमारुती क्रिकेट क्लबचे पदाधिकारी राघवेंद्र दैवज्ञ व एन. बी. पाटील यांनी स्पर्धा आयोजक परशराम पाटील, मिलिंद चव्हाण व सचिन साळुंखे यांच्या उपस्थितीत स्पर्धा पुरस्कर्ते निश्चित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा सहा संघांमध्ये लिलाव होणार असून सामने साखळी पद्धतीने होणार आहेत. सर्व सहभागी सहा संघाना रंगीबेरंगी पोशाख देण्यात येणार आहे. तसेच सामने पांढऱया चेंडूने खेळविण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक बक्षिसे विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी बुधवारपर्यंत युनियन जिमखाना मैदानावर आपले अर्ज भरावेत तसेच अधिक माहितीसाठी परशराम पाटील, मिलिंद चव्हाण किंवा सचिन साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा आयोजकांनी केले आहे.









