ऑनलाईन टीम / लंडन :
भारतीय बँकांचे कोट्यवधीचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याला लंडन हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. लंडन हायकोर्टाने माल्ल्याची दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारतीय बँकांना माल्ल्याच्या कर्जवसूलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने लंडन हायकोर्टाकडे केलेल्या याचिकेत माल्ल्याच्या भारतात असलेल्या मालमत्तेचे सुरक्षा कवच काढून घेण्याची विनंती केली होती. त्याला लंडन हायकोर्टाने मान्यता दिली. त्यामुळे ज्या बँकांचे कर्ज वसूल झाले नाही, त्या बँका माल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करुन आपले कर्ज वसूल करु शकतील.









