वॉशिंग्टन \
भारतीय वंशाच्या रचना सचदेव कोरहोनेन यांची माली येथील राजदूत म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नियुक्ती केली आहे. गेल्या एका महिन्यात अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळालेले हे तिसरे नामांकन आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, बायडेन यांनी भारतीय वंशाच्या पुनीत तलवार यांची मोरोक्कोचे राजदूत आणि भारतीय वंशाच्या राजकीय कार्यकर्त्या शेफाली राजदान दुग्गल यांची नेदरलँड्समध्ये राजदूत म्हणून नियुक्ती केली होती.
रचना सचदेव कोरहोनेन सध्या यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या जॉइंट एक्झक्मियुटिव्ह ब्युरो फॉर नियर ईस्टर्न अफेयर्स आणि दक्षिण आणि मध्य आशियाई ब्युरोचे उप सहाय्यक सचिव आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करत मालीच्या राजदूतपदी नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात यूएस फॉरेन सर्व्हिसमधून केली होती.









