जीवनावश्यक वस्तू-साहित्य वेळेत मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्वच मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अन्नपदार्थ व इतर साहित्याची ने-आण करण्यासाठी मालवाहतूक गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा, राज्य व देशांतर्गत सर्व माल वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील 20 ते 25 हजार वाहने मागील रविवारपासून बंद होती, ती आता रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तू, अन्नपदार्थ मिळणार आहेत.
मालवाहतूक बंद असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत होता. त्यामुळे मालवाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात ज्या वाहनांचे परवाने संपले आहेत, चालक परवाने, इन्शुरन्स यासारख्या सेवांसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. टोल नाक्मयाजवळ वाहकांना सेवा देण्यात येणार आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱयांवर होणार कारवाई
मालवाहतूक करणाऱया वाहनांना अत्यावश्यक सेवा, साहित्य, अन्नधान्य पुरविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या वाहनांमध्ये चालक, वाहक व मोजके हमाल इतक्मयांनाच परवानगी देण्यात आली आहे. तरीही या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱया चालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा बेळगावच्या आरटीओंनी दिला आहे.
24 तास हेल्पलाईन सुरू शिवानंद मगदूम (आरटीओ, बेळगाव)
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व मालवाहतूक करणारी वाहने सुरू करण्यात आली आहेत. वाहतूक करणाऱया चालक व वाहकास कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. वाहनांसाठी पंक्चर दुकाने, वाहने दुरुस्तीसाठी शोरूममधील कर्मचाऱयांना कामावर बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









